AIASL Recruitment 2023 10वी ते पदवीधर उमेदवारांसाठी मुंबईत नवीन भरती निघाली आहे. एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मार्फत विविध पदांच्या भरतीसाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीच्या तारखा खाली दिलेल्या आहेत.
या भरती अंतर्गत एकूण 480 जागा भरल्या जाणार आहे. भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून उमेदवारांनी अर्ज करावा. AIASL Bharti 2023
कोणती पदे भरली जाणार आणि पात्रता काय?
1) मॅनेजर-रॅम्प/मेंटेनेंस 03
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी + 15 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 20 वर्षे अनुभव किंवा MBA + 17 वर्षे अनुभव
2) डेप्युटी मॅनेजर-रॅम्प/मेंटेनेंस 04
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 16 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी + 11 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 16 वर्षे अनुभव किंवा MBA + 12 वर्षे अनुभव
3) सिनियर सुपरवाइजर-रॅम्प/मेंटेनेंस 28
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर + 13 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी + 08 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 13 वर्षे अनुभव (ii) LVM
4) ज्युनियर सुपरवाइजर-रॅम्प/मेंटेनेंस 12
शैक्षणिक पात्रता : i) पदवीधर + 07 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 07 वर्षे अनुभव (ii) LVM
5) सिनियर रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 15
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 07 वर्षे अनुभव किंवा ITI/NCVT(मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/AC/डिझेल मेकॅनिक/बेंच फिटर/वेल्डर) (ii) HVM (iii) 04 वर्षे अनुभव
6) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 30
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 07 वर्षे अनुभव किंवा ITI/NCVT(मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/AC/डिझेल मेकॅनिक/बेंच फिटर/वेल्डर) (ii) HVM
7) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 30
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव (iii) HVM
8) टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA + 17 वर्षे अनुभव
9) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर 03
शैक्षणिक पात्रता : पदवीधर +18 वर्षे अनुभव किंवा MBA + 15 वर्षे अनुभव
10) ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर 05
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 18 वर्षे अनुभव
11) टर्मिनल मॅनेजर-कार्गो 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA + 17 वर्षे अनुभव
12) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो 02
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA + 15 वर्षे अनुभव
13) टर्मिनल मॅनेजर-कार्गो 07
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव
14) ड्यूटी ऑफिसर-कार्गो 10
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
15) ज्युनियर ऑफिसर-कार्गो 09
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा MBA + 06 वर्षे अनुभव
16) सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 50
शैक्षणिक पात्रता :(i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव
17) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 165
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
18) ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 100
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण
19) पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 05
शैक्षणिक पात्रता : पदवीधर+नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग)
निवड प्रक्रिया
प्रतिसादाच्या आधारे अधिकारी वैयक्तिक/मुलाखत, व्यापार चाचणी घेतील किंवा गट चर्चा देखील सुरू करू शकतात.
मुलाखतीच्या तारखा
इच्छुक उमेदवार 25 ते 30 मे 2023 दरम्यान खाली नमूद केलेल्या ठिकाणी मुलाखतीसाठी हजर राहू शकतात.
मुलाखतीचे ठिकाण: GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai-400099.
वयोमर्यादा :
अर्ज करणारा उमेदवाराचे वय 01 मे 2023 रोजी 28 ते 50 वर्षांपर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/ 500/- रुपये [SC/ST/ExSM: फी नाही]