AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत 276 जागांसाठी भरती

AFCAT Recruitment 2023: भारतीय हवाई दलाने AFCAT भरती अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 1 जूनपासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 आहे.

या भरतीअंतर्गत 276 जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

रिक्त पदाचा तपशील :
AFCAT
एंट्री फ्लाइंग – 11 जागा
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)- 151 जागा
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) – 114 जागा

NCC स्पेशल एंट्री
फ्लाइंग -10% जागा

शैक्षणिक पात्रता:

AFCAT एंट्री- फ्लाइंग: 60% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
AFCAT एंट्री: (i) ग्राउंड ड्युटी (टेक्निकल):50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.
AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स)
NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग: NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

वय श्रेणी
भारतीय हवाई दल AFCAT भरती 2023 साठी वयोमर्यादा फ्लाइंग शाखा आणि तांत्रिक आणि गैर-तांत्रिक शाखा या दोन्हींसाठी स्वतंत्रपणे ठेवण्यात आली आहे.
फ्लाइंग ब्रँचसाठी अर्जदाराची वयोमर्यादा 20 ते 24 वर्षे असावी. 1 जुलै 2023 हा आधार मानून वयाची गणना केली जाईल.
ग्राउंड ड्युटी (तांत्रिक आणि गैर-तांत्रिक) शाखेसाठी, अर्जदाराची वयोमर्यादा 20 ते 26 वर्षे असावी. यामध्ये 1 जुलै 2023 हा आधार मानून वयाची गणना केली जाईल.

अर्ज फी :
अर्ज शुल्क सर्व श्रेणींसाठी 250 रुपये ठेवण्यात आले आहे. शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरले जाईल.

निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा
हवाई दल निवड मंडळ (AFSB)
दस्तऐवज सत्यापन
वैद्यकीय तपासणी

याप्रमाणे अर्ज करा
सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
Apply Online वर क्लिक करा.
आता तुम्हाला इंडियन एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्टवर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
आता आवश्यक कागदपत्र फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

वेबसाईट : indianairforce.nic.in
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी :
Click Here