देशात मागील काही काळात झालेल्या महागाईचा परिणाम शिक्षणावर देखील झाला आहे. दिवसेंदिवस शिक्षण महाग होत चालले आहे. मात्र योग्य करिअर बनविण्यासाठी उच्च शिक्षण घेणे देखील गरजेचं झालं आहे. पण उच्च शिक्षणासाठी हवा तो म्हणजे पैसा. यातही परिस्थिसमोर गुडघे न टेकता अनेक तरुण-तरुणी पार्ट टाईम काम करून शिक्षण पूर्ण करत आहे.
सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर क्लिक करा
जर तुम्हीही अभ्यासासोबतच पार्ट टाईम काम करण्याचा किंवा पार्ट टाईम नोकरी करण्याचा विचार करतात. तर आज आम्ही तुम्हाला अभ्यासावर परिणाम न करता कोणते पार्ट टाईम काम करून चांगले पैसे कमावू शकतात याबाबत सांगणार आहोत.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी अभ्यासासोबत पार्ट टाईम काम करतात ते स्वावलंबी होतात आणि त्यांच्या गरजा स्वतः पूर्ण करतात. विशेष गोष्ट अशी आहे की अशा अनेक नोकऱ्या आहेत ज्या पार्ट टाईम म्हणून केल्या जाऊ शकतात आणि चांगले पैसे कमवू शकतात. यामध्ये पहिल्या क्रमांकावर डेटा एन्ट्री ऑपरेटरचे काम आहे. हे काम लॅपटॉप किंवा स्मार्टफोनने कुठूनही ऑनलाइन पद्धतीने करता येते. आयटीचे शिक्षण घेणाऱ्या अशा विद्यार्थ्यांना वेबसाइट डिझाइन करून पैसे कमविण्याची संधी आहे. यासाठी त्यांना नियमित काम करण्याचीही गरज नाही. हे काम मोकळ्या वेळेत करता येते.
ऑनलाइन बाजार
आज अनेक तरुण घरबसल्या ऑनलाइन मार्केटमधून चांगली कमाई करत आहेत. यासाठी ते कोणत्याही उत्पादक किंवा घाऊक विक्रेत्याकडून कोणताही माल घेतात आणि काही नफा घेऊन ऑनलाइन ग्राहकाला विकतात. यामुळे त्यांना चांगली बचत होते. याशिवाय लेखनाची आवड असणारे अनेक तरुण आपले ब्लॉग लिहून आणि फ्रीलान्सर म्हणून लिहून चांगले पैसे कमावतात. अभ्यास करणारे, कोरेल आणि इलस्ट्रेटरसारखे सॉफ्टवेअर शिकणारे तरुण घरबसल्या लोकांची कामे करू शकतात आणि पैसे कमवू शकतात. ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे ते हे काम अर्धवेळ करू शकतात.